सर्वसमावेशक मराठी

         मायमराठीच्या सर्वांगीण वीकासासाठी, संगणकीय कामात मराठीचा वापर वाढावा यासाठी  शुभानन गांगल सर खूप महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांचा संगणकीय कामात मराठी चा वापर करणे, विदयार्थ्यासाठी तयार केलेले अनेक महत्त्वाचे सॉप्टवेयर याठिकाणी मराठीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .  ते आपण खाली दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड करु शकतो.
          
          आपण गांगल सरांच्या कामाविषयीचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी त्यांनी  सादर केलेले काही महत्त्वाच्या उपक्रमां विषयी माहिती घेवू. 

1) 'जलद सोप्पी मराठी' हे संगणकात मायक्रोसॉफ्टमधुन चालणारे, जेथे जेथे इंग्रजी तेथे तेथे मराठी टाइप करता येणारे, सॉफ्टवेअर सर्वांसाठी मोफत उपलब्ध केले आहे. फेसबुक, ऑर्कुट, वेबसाइट, इमेल, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, पेजमेकर, फोटोशॉप, कोरल, . . . अशा सर्व ठीकाणी मराठी टाइप करता येण्याची सोय यातुन मीळते. सात युनीकोडचे कलात्मक फॉण्ट आणी चौदा टीटीएफचे आकर्षक फॉण्ट यातुन मीळतात. आजवर मराठी व्याकरणकारांना संगणक व संगणककारांना मराठी व्याकरण पुर्ण माहीत नसल्याने ज्या ज्या टायपिंगमधल्य तृटी होत्या त्या सर्व यातुन नेस्तनाबुत केल्या आहे. केवळ एक बटण ऑन केलेत की जेथे जाल तेथे मराठी टाइप होण्याची सहजसुलभता यातुन मीळते. कीबोर्डच्या कॅपीटल व स्मॉल चाव्यांच्याच केवळ वापरातुन, व्यंजन व स्वर केवळ एकेका चावीतुन टाइप करण्याची सोय यात आहे. '''हवेवर ओठांनी लीहावे तसे कागदावरच्या शाइला बोलता यावे, जीभेच्या टोकावर असलेले मराठी संगणकात बोटांच्या टोकातुन झीरपावे''' या घोष-वाक्याला साजेसे हे सर्व सॉफ्टवेअर बनवले आहे. 

2) 'कवीता-आस्वाद गझल-आस्वाद' हे साडेतीन हजार वर्षांतल्या मानवी संस्कृतीत आजवर आलेल्या काव्यातील लयतालवीचार ओळखुन दाखवणारे सॉफ्टवेअर नीर्माण केले आहे. यातल्या कवीता-वीभागात मराठी मजकुर टाइप केला की टाइप केलेल्या मजकुरातील अक्षर-संख्या, लघु-अक्षर-संख्या, गुरु-अक्षर-संख्या, मात्रांक, लघुत्व, लगक्रम, वृत्ताचे नाव, जातीचे नाव, छंदाचे नाव संगणक ओळखुन दाखवतो. टाइप केलेल्या मजकुरातील संगणकाला 1171 वृत्ते, 591 जाती व 83 छंद नावासह ओळखायला भाग पाडले आहे. कवीच्या प्रज्ञा व प्रतीभांना बाधा न आणता, संगणक त्यांचा मीत्र बनुन, काव्यातील लयतालवीचारांबाबतचे रचना कौशल्य, कवीता टाइप करता करताच सादर करत जातो. 

3) ''मोडीलीपीसाठीचा युनीकोडचा फॉण्ट'' – भारताचा जास्तीत इतीहास हा मोडीलीपीतल्या हस्तलीखीतात धुळ खात पडुन आहे. आता मोडीलीपी अतीशय कमी लोक जाणतात. करोडो-करोडो पानातील अप्रकाशीत भारतीय इतीहास कसा प्रगट होणार हा फार महत्त्वाचा प्रश्न आजवर सोडवता आला नाही. मोडीलीपीचे शीक्षण देणारे क्लासेस फार कमी आहेत. मोडीलीपी शीकल्याने आता कोणाला शीक्षण, कामधंदा, नोकरी, पैसा वा मानसन्मान मीळत नाही. केवळ भारताचा इतीहास प्रकाशीत करणे एवढ्याच कारणास्तव मोडीलीपी शीकणे यात कोणीही आस्था दाखवत नाही. मोडीलीपीचे क्लासेस जॉइन करणे, तेथे जाण्यायेण्यात वेळ व पैसा खर्च करणे, अनुपस्थीत राहील्यावर झालेला अभ्यास भरुन काढणे, लहानमुलांप्रमाणे कागदावर गीरवत मोडी लीपी शीकणे, मोडीलीपी शीकल्यानंतर मोडीतील ऐतीहासीक पाने वाचताना आलेल्या अडचणींची दखल घेण्यासाठीची आवश्यक तरतुद नसणे, अशा शेकडो अडचणी यात आहेत. यासाठी 'जलद सोप्पी मराठी' या मोफत उपलब्ध केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन 'मोडीलीपीचा अत्याधुनीक युनीकोडचा फॉण्ट नीर्माण करण्यात शुभानन गांगल यशस्वी झाले आहेत. हे सारे तंत्रज्ञान मायमराठीच्या वीकासासाठी त्यांनी सर्वांना मोफत उपलब्ध केले आहेत. याबाबतचा फॉण्ट, तक्ते, फाइल्स, माहीती, पॉवरपॉइंट अशा असंख्य गोष्टी उपलब्ध केल्या आहेत. मोडीलीपी ही मराठीचीच लीपी असल्याने, '''मोडीलीपी शीकणे म्हणजे डोळ्यांना मोडीलीपीच्या चीन्हांची सवय लावुन त्यातील मराठी वाचता येणे होय''', या तत्वावर हा फॉण्ट जणु मोडीलीपीचे शीक्षण देणारा स्वयंपुर्ण शीक्षकच ठरतो. या सर्व गोष्टींचा आपापल्या घरगुती संगणकात परस्पर लाभ घेउन घर-बसल्या मोडीचे शीक्षण देणारा अभीनव उपक्रम सर्वांसाठी मोफत उपलब्ध केला आहे. जर कोणाला याबाबत वैयक्तीत मुलभुत मार्गदर्शन हवे असेल तर इमेलने सशुल्क मार्गदर्शनाची सोयही उपलब्ध केली आहे.

4) ''संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट'' – प्रत्येक भाषेत गद्य, पद्य व संगीत असे तीन भाग असतात. पण इंग्रजांनी जगभर राज्य केले तेव्हापासुन भाषा-शीक्षणात केवळ गद्य व पद्य एवढे दोनच भाग शीकवले जाउ लागले. भारतात मात्र त्याआधी गावागावात पहाटे जात्यावरच्या ओव्यांपासुन ते सायंकाळच्या भजनांपर्यंत संगीतचे सुर सामान्यांच्या कानी पडत होते. रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, बहीणाबाइ, . . . असे अनेक संत महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या प्रत्येकांनी उत्तम वीचार आणी अध्यात्माची ओळख अनोख्या व वैशीष्ट्यपुर्ण काव्यरचनांतुन मांडली. त्यांना हे सारे काव्याचे ज्ञान घराघरांनी दीले. त्यावेळी कोणत्याही शाळेतुन त्यांनी कुठेही शीक्षण घेतले नाही. ही होती महाराष्ट्राची संगीतमय संस्कृती. काही वर्षांपुर्वी पेटी व तबला घरोघरी असे. अधुनमधुन देवळात, चाळीत, घरात, कौटुंबीक मीत्रमंडळींची मैफील भरत असे. स्वतः गाणे वा वाद्य वाजवणे याला प्रतीसाद मीळत असे. कुठे गेली ही महाराष्ट्राची संगीतमय संस्कृती? याला आधुनीक युगात पुन्हा पालवी फुटावी यासाठी शुभानन गांगल यांनी सादर केला आहे, ''युनीकोडचा संगीतासाठीचा फॉण्ट''. मायमराठीच्या सर्वांगीण वीकासासाठी हा फॉण्ट आणी त्याबाबतची माहीती, पॉवरपॉइंट, तक्ते, फाइल्स अशा बर्‍याच गोष्टी मोफत उपलब्ध केल्या आहेत. घराघरानी याचा लाभ घ्यावा, शाळाशाळांनी आपापल्या अभ्यासक्रमातील कवीतांना चाली लावुन मुलांना संगीताचे ज्ञान द्यावे, ही अपेक्षा आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी' हे सात सुर आणी त्यांच्या चार कोमल व एक तीव्र सुरासह एकुण बारा स्वर कवीतेच्या अक्षरांनाच जोडता येण्याची सोय यातुन मीळते. 

5) ''बोबडा संगणक'' – महाराष्ट्रातल्या घराघरातील बाळांना बोबडे बोलायला यायच्या आधीच संगणकातुन मराठी टायपींग करण्याची अनोखी व अद्वीतीय सोय शुभानन गांगल यांनी मोफत उपलब्ध केली आहे. कीतीही बटणे शेजारी-शेजारी असली तरी लहानमुलांच्या लक्षात गोल-गोल फीरणार्‍या फॅनचे बटण नक्की लक्षात राहते. याचाच वापर शुभानन गांगल यांनी संगणकातुन केलेला आहे. या उपक्रमाला ''बोबडा संगणक'' असे नाव दीले आहे. यात अनेक फाइल्स, तक्ते, लेख, फाइल्स आहेत. हे नवे तंत्रज्ञान मुलांच्या आणी पालकांच्या मानसीकतेचा वीचार करुन बनवले आहे. त्यातील काही उदाहरणे - इंग्रजीतील 'के' ही चावी दाबली की एकाच चावीतुन मराठीतील 'कमळ' हा पुर्ण शब्द त्याच्या जवळ दीलेल्या कमळाच्या चीत्राजवळ उमटतो. अवयवांची, प्राण्यांची, पक्षांची, नात्यांची, . . . अशा अवतीभवतीच्या गोष्टींची ओळख संगणकातुन हसतखेळत करुन घेता येते. 'बोबडा संगणक'' या उपक्रमातुन आजी-आजोबा, संगणकातल्या रंगीत चीत्रमय स्वरुपातुन, बोबडे बोलायलाही न येणार्‍या बाळाला कडेवर घेऊन, त्यांना मराठी टायपींग शीकवु शकतात. संगणक आणी मराठी यांची सांगड, ऑफीसच्या वा नोकरीतल्या कामाची गरज म्हणुन आपल्या आजच्या आयुष्यात मोठेपणी क्वचीतच डोकावते. त्यामुळे आपल्या पीढीच्या मनात संगणक म्हणजे इंग्रजी असे समीकरण तयार झाले आहे. 'बोबडा संगणक'' या उपक्रमातुन पुढील पीढीला लहानपणीच संगणक कोणी शीकवला? तर आजी-आजोबांनी असे सांगता येईल! यातुन '''मराठी = संगणक''' असे समीकरण पुढील पीढीच्या मनात गोंदवले जाइल. यातुन मराठीला स्वाभीमान व स्थैर्य प्राप्त होइल असा वीश्वास वाटतो.
                 या उपक्रमांशीवाय '''मराठीचे शास्त्रीय, नैसर्गीक, उपजत, मुलभुत व्याकरण''' हा प्रोजेक्ट पुर्ण झाला आहे. त्याचे प्रसारण मराठीची ''जडणघडण, व्यवस्थापन व व्याकरण'' अशा क्रमाने सादर होत आहे.
या सार्‍या उपक्रमांबाबतची शीबीरे, कार्यक्रम, सभा, प्रशीक्षण वर्ग महाराष्ट्रभर घेतले जात आहेत. आपण ही यासाठी शुभानन गांगल यांच्याशी संपर्क साधा.
               सुरु असलेल्या सर्व उपक्रमांचे सॉफ्टवेअर, फाइल्स, फॉण्ट, पॉवरपॉइंट अशा अनेक गोष्टी फेसबुकवरच्या ''सर्वसमावेशक मराठी''https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर उपलब्ध केल्या आहेत. आपण या ग्रुपवर सामील होउन मराठीच्या वीकासात सहभागी होउ शकता.
(नोंद – लेखनात केवळ एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत)

श्री शुभानन गांगल सरांनी तयार केलेले विविध शैक्षणिक सॉप्टवेयर डाऊनलोड खालील लिंक वरुन करा.

मराठी युनिकोड फॅान्ट                              
भिन्न्‍ा परिमाणांत रुपांतर                                         डाऊनलोड
क्षेञफळ आणि आकारांची मोजदाद                           डाऊनलोड
एकम-दहम - शतम                                                डाऊनलोड
अंकांचे शब्दांकन                                                    डाऊनलोड
बेरीज                                                                  डाऊनलोड
वजाबाकी                                                             डाऊनलोड 
गुणाकार                                                               डाऊनलोड    
भागाकार                                                              डाऊनलोड   
कसोटया भाग 1                                                     डाऊनलोड
कसोटया भाग 2                                                     डाऊनलोड
प्राइम नंबर व विभाजन कृती                                    डाऊनलोड
ञैराशीक                                                              डाऊनलोड
शेकडा व्याज                                                         डाऊनलोड 
व्याज लोन परत फेडीचा हप्ता                                   डाऊनलोड
चक्रवाढ व्याजाचा हिशोब                                        डाऊनलोड
गणोबा गणोबा, हाजीर हो ... मदत                           डाऊनलोड  



सर्व समावेशक मराठी संदर्भात आपणास अधिक माहिती मिळविण्यासाठी  
 संपर्क साधा – शुभानन गांगल मोबाइल – 9833102727 इमेल – shubhanan.gangal@gmail.com

2 comments:

  1. खूपच उत्तम प्रकार मला आज पहावयास मिळाला, निर्मात्याला शत धन्यवाद ,
    आपले बद्दलचा आदर द्विगुणीत झाला

    ReplyDelete
  2. Very nice and useful
    But please change method of subtraction

    ReplyDelete